पुणे

महावितरणच्या थेऊर शाखेचा ढिसाळ कारभार..

मांजरी ता.२६: कोलवडी (ता.हवेली) परिसरातील स्टार सिटी सोसायटी, मांजरी कोलवडी शिवरस्ता या ठिकाणी सुमारे २५ ते ३० घरे आठवड्यातून दोन ते तीन दिवस अंधारात असतात. महावितरणच्या कारभाराने येथे राहणारे स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या रोहित्राची क्षमता कमी अन् त्यावर असलेल्या वीजजोडांचा वापर व मागणी जास्त आहे.तीन फेज पैकी सातत्याने कोणताही एक फेज बंद पडण्याने येथील रहिवाशी खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहेत. त्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होत नाही, त्यांच्या तक्रारीची दखल वेळेत घेतली जात नाही.
वायरमनला फोन केला तर त्यांनी सांगितले की, आम्हाला सध्या थकबाकी वसुलीचीच कामे सांगितली आहेत, दुरुस्तीकडे लक्ष द्यायचे नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने तुमच्या तक्रारीची वेळेवर दखल घेऊ शकत नाही. शिवाय थेऊर येथील महावितरण शाखेला गेल्या तीन महिन्यापासून अधिकारी नसल्याने, कुंजीरवाडीचे सहाय्यक इंजिनियर अलदार यांच्याकडे थेऊरचा चार्ज आहे त्यांचेही या भागातील समस्यांकडे म्हणावे असे लक्ष नाही. त्यामुळे थेऊर महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांचे वीज पुरवठ्याबाबतीत दुर्लक्ष होत असल्याने येथील गावांची अक्षरशः पराकोटीची गैरसोय होत असताना देखील याकडे महावितरणचे दुर्लक्ष होण्याने जनता त्रस्त झाली आहे.

रोहित्राची क्षमता कमी असल्याने सतत फ्यूज उडत असतो. रात्री अपरात्री कधीही वीज जात असते. त्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. शेतीचा परिसर असल्याने साप विंचूचा उपद्रव भेडसावत असतो. यासंबंधी वीज कर्मचाऱ्यांना कळवूनही दखल घेतली जात नाही. वरिष्ठांना कळवले तर मोगम उत्तर देऊन टाळाटाळ करत असतात. अशाने येथील रहिवासी हतबल झाले आहेत. याची दखल वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व रहिवाशांना आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर नाही असे येथील रहिवासी प्रभाकर क्षीरसागर यांनी सांगितले.

या सर्व परिस्थितीवर लवकरात लवकर उपाय योजना केली जाईल असे उपकार्यकारी अभियंता महेश धावडे यांनी सांगितले.

Spread the love

Related posts

हडपसर येथे प्लंबर्सना मोफत हेल्मेट वाटप..

admin@erp

दिव्यांग बांधवांना स्वयं रोजगारसाठी गाळे मिळावे अशी मागणी दत्तात्रय ननावरे यांनी केली.

admin@erp

भेकराईमाता विद्यालयात क्रांतिदिन, आदिवासी दिन साजरा

admin@erp