माऊली संकुल सभागृहअहिल्यानगर येथे नुकताच स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान सोहळा संपन्न झाला
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश कुमार पावसे, श्रीमहंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ उज्जैन महाकाल, डॉ.सुधा कांकरिया,डॉक्टर शंकर अंदानी, सिनेतारका रुचिरा देसाई, महाराष्ट्रातील सर्व सरपंच ग्रामपंचायत शिक्रापूर सन्माननीय सदस्य त्रिनयन कळमकर,प्रकाश वाबळे उपस्थित होते
गावामध्ये व परिसरामध्ये कर्तव्य फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने केलेली कामे आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप,वह्यावाटप, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम,बचत गटांना ट्रेनिंग अनाथ आश्रम शाळेला मदत,दिव्यांगांना मदत, ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळ वाटप,सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे, सालाबाद प्रमाणे एक जानेवारी येथे आलेल्या भीम अनुयायांना अल्पोहार,चहा,पाणी वाटप इत्यादी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कामाबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय महिला समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कर्तव्य फाउंडेशन अध्यक्षा सौ. मनीषा रमेश गडदे, अंकुश घारे, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पत्रकार राजाभाऊ गायकवाड महेश शिर्के पत्रकार उदय ब्राह्मणे पत्रकार निलेश जगताप भरत खोले संकेत गडदे हार्दिक गडदे सौ, मेघा तांबे सौ वंदनाताई रामगुडे सौ वैशाली गायकवाड सौ कल्याणी गडदे सौ सीमा कळमकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
next post
