आयुर्वेदिकआरोग्य

मध खाण्याचे फायदे..

प्रतिनिधी : – नूतन पाटोळे

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मधाचे फायदे
    मध मध्ये शरीराला आवश्यक असलेल्या अँटिऑक्सिडंट चे प्रमाण भरपूर असते. हे अँटिऑक्सिडंट अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याची शक्ती प्रदान करतात. सोबतच हृदय संबंधित रोग देखील कायमचे दूर राहतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज रात्री एक चमचा मध हलक्या दुधासोबत प्यावे. असे केल्याने झोप देखील चांगली लागते.
  • जखम सुधारण्यासाठी मधाचे फायदे
    बऱ्याचदा लहान मोठ्या अपघातामुळे मुक्का मार बसणे किंवा रक्त आल्याने शरीरावर जखम होऊन जाते. अशावेळी जखम भरून काढण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकते. मधामध्ये जीवाणू विरोधी आणि फंगस व बॅक्टेरिया दूर करणारे गुणधर्म असतात. जे जखमेवरील बॅक्टेरियाचे संक्रमण थांबवतात आणि जखम लवकर भरून काढतात.
    जर आपल्याला लहान जखम अथवा शरीरावर पोळले गेले असेल तर प्रभावित जागेवर कच्चे मध लावावे. काही वेळातच त्या जागेवरील खाज कमी होईल. हा उपाय नियमितपणे केल्याने जखम लवकर बरी होईल.
  • गळ्यात दुखणे (tonsils)
    जर आपल्याला सर्दी खोकला मुळे गळ्यात दुखणे व खोकला येण्याची समस्या निर्माण झाली असेल तर आपण मधाचे सेवन करू शकतात. यासाठी एक चमचा अद्रक रस मध्ये एक ते दोन चमचे मध टाकावे आणि दिवसातून दोन वेळा याचे सेवन करावे. हा उपाय केल्याने देखील खोकला आणि गळ्यात दुखणे दूर होते.
  • सुंदर आणि नितळ त्वचेसाठी मधाचे फायदे
    मधाचे फायदे फक्त शरीर आणि रोगांपर्यंत मर्यादित नसून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याकरिता देखील मध वापरले जाते. अनेक सौंदर्य क्रीम मध्ये मधाचा वापर केला जातो. म्हणून आता आपण जाणून घेऊया सौंदर्य वाढवण्यासाठी मधाचे फायदे.
    ज्या लोकांची त्वचा कोरडी असेल, अथवा चेहऱ्यावर वांग, काळे डाग, सुरकुत्या, काळेपणा इत्यादी समस्या असतील त्यांनी दररोज चेहऱ्यावर 15-20 मिनिटे मधाचा फेसपॅक लावावा. असे केल्याने चेहऱ्यावर ग्लो तर येईलच परंतु काळे डाग, मुरूम, वांग आणि सुरकुत्या कायमचे दूर होतील.
    याशिवाय हिवाळ्याच्या दिवसात ओठ फुटण्याची समस्या होते. यासाठी रात्री झोपण्याआधी मध आणि शुद्ध देसी तूप एकमेकात मिक्स करून ओठांना लावावे. हा उपाय केल्याने फुटलेले ओठ चांगले आणि नरम होतील.
  • केसांसाठी मधाचे फायदे
    मधात असलेले गुणधर्म केस आणि केसांच्या त्वचेसंबंधी असलेल्या समस्या दूर करते, सोबतच केसांचा विकास आणि वाढ देखील सुधारते.
    • यासाठी दही सोबत मध मिसळून केसांना लावावे. असे केल्याने खराब व निर्जीव झालेल्या केसांना बळ आणि पोषण मिळते.
    • मध आणि अंड्याच्या आतील भागापासून बनलेले हेयर मास्क केसांची चमक वाढवते.
    • मध आणि कोरफड हे मिश्रण केसांची वाढ जलद करते.
Spread the love

Related posts

दुधात गूळ मिळवून पिण्याचे फायदे …

admin@erp

जर्दाळू खाण्याचे फायदे …

admin@erp

अननस खाण्याचे फायदे: 

admin@erp