पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

भेकराईमाता विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन…

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे


फुरसुंगी : – बदललेली परीक्षा पद्धती व मूल्यमापन पद्धती, शाळा मुलांसाठी राबवत असलेले विविध उपक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी फक्त मुलांनाच माहिती न होता, पालकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत या उद्देशाने, श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीच्या श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी जरी शाळेची असली, तरी पालकांचाही तेवढाच सहभाग महत्वाचा असून, आई -बाबा हे मुलांचे पहिले गुरु असतात. संस्काराची खरी सुरुवात ही घरापासून होते. मुलं हीच आपली संपत्ती आहे, त्यांना जपा, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांची इतरांशी तुलना करू नका, असे मत मुख्याध्यापक डॉ. सुनील कामठे यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्याध्यापक सुनील दीक्षित यांनी दिली. मोबाईलपासून मुलांना दूर ठेवून, त्यांच्याशी सुसंवाद साधा असे पर्यवेक्षिका यास्मिन इनामदार यांनी मत मांडले. पालक प्रतिनिधिंच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मेळाव्याची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी करता येईल, हे सांगतानाच आम्ही याच शाळेतील शिक्षकांमुळे घडलो, आणि आमची मुलेही येथे नक्कीच घडतील असा विश्वास पालक लंबोदर विटणकर यांनी व्यक्त केला. तर सौ. शुभश्री शिंद आणि शंकर शिंदे या पालकांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकूण घेऊन त्या सोडवण्याचे मुख्याध्यापकांनी आश्वासन दिले. महादेव शिवरकर, मंदा वाघमारे, ज्ञानेश्वर कामठे यांनी मुलांचा अभ्यास, शिस्त आणि करिअर विषयी मार्गदर्शन केले. अपर्णा बिरदवडे, चांगदेव लडकत, दीप्ती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप जाधव, सतीश भोंडवे, ठाकरे बी. के. यांनी आभार मानले.

Spread the love

Related posts

सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी कमल भुजबळ यांची निवड…

admin@erp

तळेगाव येथे उपद्रवी हुमणी किड प्रतिबंध प्रशिक्षण संपन्न.

admin@erp

पोटच्या गोळ्याला फेकुन पसार झाली आई, महिला पोलिस बनल्या दायी

admin@erp