पुणेमनोरंजनमहाराष्ट्रशैक्षणिक

भेकराईमाता विद्यालयात क्रांतिदिन, आदिवासी दिन साजरा

प्रतिनिधी :-अशोक आव्हाळे

फुरसुंगी – (प्रतिनिधी) श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीच्या श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन, क्रांती दिन आणि आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी हुमेरा शेख, मुख्याध्यापक डॉ. सुनील कामठे, उपमुख्याध्यापक सुनील दीक्षित, पर्यवेक्षक यास्मिन इनामदार, मारुती खेडकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक, देशभक्त यांच्या वेशभूषा करून देशप्रेमाची अनुभूती दिली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला. क्रांतिकारकांच्या कार्याला, या कार्यक्रमातून उजाळा मिळाला. आदिवासी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. खुशी क्षीरसागर या विद्यार्थिनीने सुंदर देशभक्तीपर गीत सादर केले. रक्षाबंधन कार्यक्रमात झाडांना राखी बांधून निसर्गाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा संकल्प करण्यात आला. माधुरी आबनावे, क्रांती कामठे, विद्या सुपेकर, उज्ज्वला हरपळे, सुजाता जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थिनी अक्षरा शिंदे, अन्विता शिंदे यांनी क्रांतिदिनाबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. राजलक्ष्मी बोरकर, प्रांजली साठे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले, तर प्रवीण भोसले यांनी आभार मानले.

Spread the love

Related posts

” उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित “

admin@erp

भुजबळ विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..

admin@erp

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया तर्फे मोफत आरोग्य सेवा..

admin@erp