प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्रातील पुरग्रस्थ कुटूंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुरामध्ये वाहून गेलेले आहे. आणि या मुलांना शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा मुलांसाठी शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या करिता पाठवण्यात आली आहे. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आलेले होते. त्या आवाहनाला सर्व शाळांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सहकार्य केले.
शिरूर तालुक्यामधील अनेक माध्यमिक विद्यालयाने अशा प्रकारचे भरपूर साहित्य एकत्र करून मदत पाठवण्यात आलेले आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र केलेली मदत ही त्यांच्यासारख्याच त्या भागामधील शिकणाऱ्या अनेक मुला मुलींना उपयोगात येईल असे मनोगत मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसमोर केले. या उपक्रमाचे ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी कौतुक केले.
