Uncategorizedमहाराष्ट्रशैक्षणिक

भुजबळ विद्यालयात वह्यांचे वाटप..

प्रतिनिधी : – भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव माध्यमिक व उच्च माध्यमिकविद्यालयात प्रसिद्ध स्त्री तज्ञ डॉ.चंद्रकांत केदारी यांच्या वतीने गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
गेली दहा वर्षापासून वह्यांशी वाटप विद्यालयात केले जाते गोरगरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मदत म्हणून हा उपक्रम डॉ.चंद्रकांत केदारी यांच्यामार्फत केला जातो ,असे त्यांचे बंधु श्री राजेंद्र केदारी यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी भावी जीवनात डॉ. चंद्रकांत केदारी यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपली शैक्षणिक वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री मनोज आल्हाट श्री माऊली शेठ आल्हाट प्रशालेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव भुजबळ या कार्यक्रमाची प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शालन खेडकर यांनी केले व आभार प्रदर्शन किरण झुरंगे यांनी केले.

Spread the love

Related posts

भेकराईमाताच्या पालखी सोहळ्यातून पर्यावरण, साक्षरता, व्यसनमुक्ती संदेश.

admin@erp

पांडुरंग दिंडि सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान.

admin@erp

कोलवडी येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..

admin@erp