प्रतिनिधी : – भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील एकूण 43 विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये प्रविष्ट झाले होते त्यापैकी 22 विद्यार्थी पात्र झाले व इयत्ता आठवी स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत 6 विद्यार्थी आले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब चव्हाण सर यांनी दिली गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :
सृष्टी रामदास भुजबळ गुण 252 तन्वी सोमनाथ घुले गुण 236 प्रणाली उमेश गुजरे गुण 234 श्रावणी निलेश राऊत 220 गुण अक्षरा संतोष भुजबळ 216 गुण अनुष्का गिरीश कोल्हे 212 गुण हे विद्यार्थी आठवी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले या विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे सर्व गुणवत्ता विद्यार्थी व पालक मार्गदर्शक शिक्षक यांचे ज्ञानदीप ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव भुजबळ साहेब व सौ मंगलाताई भुजबळ संस्थेच्या सचिव प्रतीक्षा गायकवाड व मुख्याध्यापक श्री चव्हाण सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अर्चना चव्हाण तसेच सहकारी शिक्षिका मीनाक्षी चेडे, शालन खेडकर, सुरेखा डोईफोडे, जयश्री भुजबळ व मेघा भंडलकर तसेच वर्गशिक्षक किरण झुरंगे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.