प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
ब्ल्यूबेरीमध्ये कमी कॅलरी असतात. त्यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम आरोग्यास फायदेशीर ठरतात. ब्ल्यूबेरी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता देखील कमी होते.
ब्ल्यूबेरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आणि पोषक तत्व असतात. दररोज ब्ल्यूबेरी खाल्ल्याने आरोग्य तर चांगले राहतेच यासह चेहऱ्याची चमकही बराच काळ टिकून राहते.
ब्ल्यूबेरी खाल्ल्यास पोटाची चरबी कमी होते.
ब्ल्यूबेरी आपल्या पोटातील जादा चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, ग्लूकोज नियंत्रित करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते.
कॅन्सरच्या आजारासाठी फायदेशीर.
ब्ल्यूबेरी कॅन्सरच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात आढळणारे अँथोसायनिन आणि अँटीऑक्सिडेंट कॅन्सरसारख्या धोकादायक आजारांना प्रतिबंधित आणि बरे करण्यास उपयुक्त आहे.
मेंदूच्या विकासास मदत करते.
त्यात आढळणारे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटो न्यूट्रीएंट मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. त्याचबरोबर सेंट्रल नर्व्हस सिस्टमचे आरोग्य देखील राखते.
हृदयाच्या आरोग्यासाठी सहाय्यक.
ब्ल्यूबेरी एथेरोस्क्लेरोसिस हृदयविकार आणि स्ट्रोक रोखण्यास मदत करते. त्यात उपस्थित फायबर अँथोसायनिन, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी असतात.