पुणे

“बोर्डींगचा व्यवहार रद्द झाला अन् जैन मुनींनी मोहोळ, गोखलेंचं कौतुक केलं पण अजित पवारांवर…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे ता.२७ : पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमीन विक्रीच्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले. या प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर जैन मुनींनी आनंद व्यक्त करत गोखले आणि मोहोळ यांचे आभार मानले.

धंगेकर यांनी आरोप केला होता की, कोट्यवधींची ही मोक्याची जागा केवळ काही कोटींमध्ये हडपण्याचा प्रयत्न गोखले यांनी केला, ज्यामध्ये मोहोळ यांनी त्यांना सहकार्य केले. मात्र, व्यवहार रद्द झाल्याने जैन समाजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जैन मुनींनी व्यवहार रद्द झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

‘काही शिष्यांनी व्यवहार रद्द होत असल्याची माहिती दिली, परंतु जोपर्यंत हा व्यवहार कायदेशीररित्या पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत त्यांचा लढा सुरू राहील. जैन समाज आणि मुनींनी या प्रकरणात पारदर्शकता आणि न्याय मिळवण्यासाठी आपली भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे’, असे जैन मुनी म्हणाले आहेत.

व्यवहारामध्ये ट्रस्टी सर्वात मोठे आरोपी आहेत. मात्र, आता बिल्डरने माघार घेतल्याने हा समाजाचा मोठा विजय आहे. ‘मित्रों की मित्रता की मिसाल’ विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ यांनी कायम केली आहे. मित्रता काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असंही जैन मुनी म्हणाले आहेत.

Spread the love

Related posts

” उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित

admin@erp

साहेबराव ढमढेरे महाविद्यालयात वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबिर..

admin@erp

“राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार..

admin@erp