प्रतिनिधी नूतन पाटोळे
समस्थितीत उभे राहा. मान हळूहळू वर करा. भ्रूमध्यात म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्यभागी पाहा. दुर्बुद्धी दूर होऊन बुद्धीचा विकास होत आहे आणि ती तीव्र, प्रखर बनत आहे अशी कल्पना करून ही क्रिया करा. छातीच्या साहाय्याने २५ वेळा श्वासोच्छ्वास करा. आपले लक्ष शेंडीच्या जागी केंद्रित करा.लाभ:शिखा मंडलाचे रोग दूर होण्यास साहाय्य होते.बुद्धीचा विकास होतो.शारीरिक आणि मानसिक क्षमतेत वाढ होते.इच्छाशक्ती किंवा संकल्पशक्तीचा उदय होतो.मंद बुद्धी कुशाग्र बनते आणि विश्लेषणशक्तीतही वाढ होते.
