प्रतिनीधी :- नूतन पाटोळे
*ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवते
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी बीट हे फारच फायद्याचे आहे. बीटमध्ये नायट्रेड्स नावाचा एक घटक असतो. जो ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असे तर तुम्ही उकडलेल्या बीटाचा रस किंवा कच्या बीटाच्या रसाचे सेवन करावे त्याच्या काही तासानंतर तुम्हाला रक्तदाबाची पातळी नक्कीच सुधारलेली दिसेल.
*ऑक्सिजन वाढवतो
शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असेत तर शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा साठा मिळवून देण्यासाठी बीट हे फारच फायद्याचे आहे. त्यामुळे बीटाचे सेवन करायला हवे.बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे.
*पचनाला करते मदत
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यांनी बीटाचे रोज सेवन करावे. बीटाची कोशिंबीर किंवा बीट उकडून सलाद करुन खाल्ले तरी त्यामुळे शरीराला फायबर मिळते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. बीट खाण्याचे फायदे मधील हा एक महत्वाचा फायदा आहे.
*प्रतिकारशक्ती वाढवते
तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग करून घेता येतो. कारण यामध्ये असणारे फायबर्स हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच बीटामधून नैसर्गिक साखर मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. तसंच बीटाचा आणि गाजराचा रस तुम्ही एकत्र करून प्यायलात तर तुम्हाला नैसर्गिक साखर तर मिळतेच शिवाय तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असल्यास, नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
*मेंदूचे कार्य करते सुरळीत
मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणे शरीरासाठी गरजेचे असते. याशिवाय मेंदूला उत्तम रक्तपुरवठा मिळणेही गरजेचे असते. बीटामध्ये असलेले नायट्रेडेट्स नावाचे घटक शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहते. मेंदूशी निगडीत आजार डिमेंशिया या आजारापासून दूर राहायचे असेल तर बीटा चे फायदे लक्षात घेत त्याचे सेवन करायला हवे.