प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.१६: अष्टापुर (ता.हवेली) येथे ९ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता अंजना वाल्मिक कोतवाल यांच्यावर बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला केला होता. या दुर्दैवी घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर वाघोली येथे खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास शासनामार्फत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे सदरील मदत अंजना कोतवाल यांना मिळावी यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मदत मंजूर झाली असून ही बाब कोतवाल परिवारासाठी दिलासादायक आहे.
उपवनसंरक्षक पुणे वनविभाग पुणे यांचेकडील आदेश क्रमांक कक्ष-३ / वन्य प्राणी /४२६६/२५.२६ दि. १५/१२/२५. या उपरोक्त विषय नुसार शासन निर्णय क्र. डब्ल्यू एल पी ०७१८/ प्र.क. २६७/ फ.१ दि.०३/०८/२०२३ च्या तरतुदीनुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास पाच लक्ष रुपये नुकसान भरपाई देणे बाबतचे तरतूद आहे त्या अनुषंगाने सौ अंजना वाल्मीक कोतवाल वय ५० वर्ष ,राहणार मौजे अष्टापुर, तालुका हवेली ,जिल्हा पुणे यांना एकूण रक्कम पाच लाख रुपये अर्थसहाय्य उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये मंजूर करण्यात आले असून सोबत वनपरिक्षेत्र पुणे कार्यालयाचा धनादेश क्रमांक१२३१५७ दि. १६/१२/२०२५ अन्वये सुपूर्द करण्यात येत आहे.
