आयुर्वेदिकआरोग्य

बाजरी खाण्याचे फायदे ..

प्रतिनिधी :- नुतन पाटोळे

बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही तर अगदी सध्या असलेल्या कोरोनावरही बाजरी उपयुक्त ठरते. प्रतिकारशक्ती वाढते.
• कोलेस्ट्रॉलवर आणते नियंत्रण
बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते. शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.
• जळजळ थांबविण्यास उपयुक्त
काही जणांना आम्लपित्त आणि जळजळीचा त्रास असतो. बाजरी खरं तर उष्ण असते. त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते असं काही जणांना वाटतं. उष्णतेच्या दिवसात याचं सेवन टाळा. पण थंडीत तुम्हाला जळजळ कमी करण्यासाठी नक्कीच बाजरीची उपयोग करून घेता येतो. मात्र प्रमाणात याचे सेवन करा. याबरोबर लोणी अथवा तूप नक्की खा.
• शरीराच्या चांगल्या पोषणासाठी
बाजरीची भाकरी ही तूप अथवा लोण्याचा गोळा आणि पालेभाजी यासाह नक्की खावी. तसंच त्यामध्ये पांढरे तीळ असतील तर अधिक उत्तम. ही भाकरी चवीला उत्तम असते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीही बाजरीची भाकरी दुधात कुस्करून खाल्ली तर शरीराला अधिक चांगले पोषण मिळते आणि लहान मुलांची तब्बेतही सुधारते. तसंच म्हशीच्या दुधातून बाजरीची भाकरी खाल्ली तर पुरुषांचे वीर्य वाढण्यासही मदत मिळते.
• हाडांना मिळते मजबूती
बाजरीची भाकरी असेल तर पालेभाजी, कढी अथवा घट्ट ताक अतिशय चविष्ट लागते. याशिवाय बाजरीपासून तुम्हाला खिचडी, पातळ घाटा, उंडे हे पदार्थही बनवता येतात. बाजरीचे नियमित सेवन केल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता. विशेषतः थंडीच्या दिवसात तुम्ही बाजरी खायला हवी. बाजरी खाण्याचे फायदे अनेक आहेत. तसंच केवळ भाकरीच नाही तर बाजरीचे अनेक पदार्थ तुम्हाला घरच्या घरी तयार करता येतात. पण जेवणात याचा समावेश करून घेणे गरजेचे आहे.
• बाळंतीण महिलांसाठीही उपयुक्त
बाळंतीण झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे असंच म्हणावं लागेल. बाळासाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाळ झालेल्या बाळंतिणींना बाजरी नक्कीच वरदान ठरते. जेवणात बाजरीची भाकरी आणि सकाळी उपाशीपोटी जर बाजरीच्या पिठाचा घाटा घेतला तर दूधही चांगल्या प्रमाणात येते. तसंच या दुधामुळे बाळ अधिक गुटगुटीत आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. बाळंत झाल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा बाजरीतून मिळते. बाजरीच्या भाकरीचा जेवणात समावेश करून घेतल्यास बाळाला दुधाची कमतरता अजिबात भासणार नाही.
• सर्दी खोकला टाळण्यासाठी
तुम्हाला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा आपल्या आहारात समावेश करून घ्या. सकाळी नाश्त्याला गूळ घालून बाजरीचा घाटा तयार करून तुम्ही नियमित प्यायल्यास ही समस्या दूर होते. कोरोना काळात (Corona) प्रतिकारशक्ती वाढविण्याची आणि उष्ण पदार्थ खाण्याची गरज आहे. त्यामुळे बाजरीचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. बाजरी खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि उर्जा राहते आणि त्यामुळे कोरोनाचीही लागण होत नाही. सर्दी खोकला हे कोरोनाचे मूळ आहे. त्यामुळे नक्की बाजरीचे पदार्थ खा.

Spread the love

Related posts

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व.

admin@erp

गवती चहा पिण्याचे फायदे…..

admin@erp

फणसाच्या बियांचे फायदे…

admin@erp