प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी दि.२२: मांजरी बुद्रुक मांजरी खुर्द गावाला मुळा मुठा नदीवरील पुलाच्या मांजरी बुद्रुक बाजूने पुलाच्या ठेकेदाराने रस्त्याला व्यवस्थित भराव न केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता आज रोजी गुरुवार (दि.२२) रोजी बांधकाम विभागाने साप्ताहिक ज्ञानलीलाच्या बातमीची व आंदोलनाची दखल घेऊन हे पाणी जेसीबीच्या साह्याने चारी काढून नदीच्या पात्रात सोडले. येथील गजेंद्र बाबा मोरे यांनी या ठिकाणी बुधवार (दि.२१) रोजी या पाण्यातून होडी चालवत होडी आंदोलन केले होते.
हे पाणी काढून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.