पुणेमहाराष्ट्रराजकीय

प्रणाली बेडगेची राष्ट्रीय हँडबाल स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची १२ वी कॉमर्स ची राष्ट्रीय खेळाडू प्रणाली बेडगे हिची हिमाचल येथे होणाऱ्या स्कुल नॅशनल हँडबाल क्रीडास्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली.
पुणे शहर संघातून झालेल्या निवड प्रक्रियेत प्रणाली बेडगे हिची संगमनेर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड श्रेणीत प्रणालीने पीपी पॉझिशनवर उत्कृष्ट खेळ केला होता. या विभागीय स्पर्धेत तिची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड प्रक्रियेतून निवड झाली होती.
रायगड येथे २८ ते ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय हँडबाल क्रीडा स्पर्धेत प्रणाली ने उत्कृष्ट खेळ खेळल्याने तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. हिमाचल येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रणाली बेडगे ही महाराष्ट्र संघातून खेळणार आहे. जिल्हास्तर ते राष्ट्रीय स्पर्धा केवळ निवड प्रक्रियेतून जाणारी एकमेव खेळाडू आहे.

प्रणाली बेडगे हिच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सचिव ॲड.संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मण पवार, सहसचिव प्रशासन आत्माराम जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य गझला सय्यद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रणालीचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक अनिल दाहोत्रे यांनीही तिला गतवर्षी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले होते.

Spread the love

Related posts

शिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

admin@erp

राष्ट्रीय माजी सैनिक किसान महा फेडरेशन अध्यक्षपदी शिवाजी अण्णा कदम यांची बिनविरोध निवड..

admin@erp

तळेगाव सोसायटीचा लाभांश खातेदारांच्या खात्यात जमा

admin@erp