प्रतिनिधी :- निलेश जगताप…
टाकळी भीमा गावचे पोलीस पाटील प्रकाश शंकर राव कर्पे यांची नुकतीच केडगाव चौफुला येथेमहाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हा कार्येकरी अध्येक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.निवडीचे पत्र दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचे हस्ते व महाराष्ट्र राजे पोलीस पाटील संघांचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यापूर्वी कर्पे पाटील यांनी गावामध्ये चांगले काम करत असताना शिरूर तालुका अध्यक्ष म्हणूनही चांगले काम केले आहे.त्यानंतर पुणे जिल्हा कार्येकरी अध्येक्ष म्हणून चांगले काम केले याची दाखल घेत त्यांची या पदावर फेर निवड करण्यात आली आहे. यापुढील काळात संघटना वाढीसाठी व जिल्यातील पोलीस पाट ला च्या आडी अडचणी सोडवणेसाठी काम करणार असलेचे कर्पे यांनी सांगितले. यावेळी शिरूर तालुका अध्यक्ष आत्माराम डफळ,पांडुरंग नरके,आबासाहेब शेलार,कृष्णा गजरे, भानुदास रोकडे, पांडुरंग दरेकर, अमित उकिरडे,वर्षा थिटे,राज्य पदाधिकारी, व जिल्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
