प्रतिनिधी :- निलेश जगताप
महाराष्ट्रातील अहिल्यानगर या ठिकाणी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी साठी आढावा बैठक रंगोली ब्लॉकेट हॉल या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांच्या व प्रमुख मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये यावेळेस जनसेवक तुकाराम डफळ कार्याध्यक्ष एडवोकेट ढमाले कॅप्टन आंधळे मेजर कैलास मेजर रंगे मेजर लंके गणेश डफळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस शिवाजीराव डोमाळे बोलताना म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आमचे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार आम्ही उभे करून निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू अशा पद्धतीचा चंग बांधला यावेळेस मेजर डफळे यांनी संपूर्ण सैनिकांमध्ये एल्गार पुकारून चैतन्य निर्माण केले व भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी चंग बांधला तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आश्वासन दिले वही आढावा बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.
