प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.६: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी कोलवडी (ता. हवेली ) येथील शशिकांत वामन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. दत्तात्रय पायगुडे यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी बुधवार (ता.६) रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी उपसभापती बिनविरोध निवड झाल्याचे जगताप यांनी जाहीर केले.
या दरम्यान सभापती प्रकाश जगताप, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या सह संचालक प्रशांत काळभोर, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, रवींद्र कंद, सुदर्शन चौधरी, मनीषा हरपळे, सारिका हरगुडे, आबासाहेब आबनावे,गणेश घुले, अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, व्हाईस चेअरमन किशोर उंद्रे व संचालक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीनंतर गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत असताना गायकवाड यांच्या समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांचे आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. ओत्न करणार असल्याचे गायकवाड यांनी आपल्या निवडी नंतर सांगितले.