प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
• शरीरातील रोगप्रतिकार शक्ती :
पीच हे फळ शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते. पीच या फळामध्ये व्हिटॅमिन्स सी जास्त प्रमाणात आढळून येते. पीच या फळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच शरीरातील काही रोग टाळण्यासाठी तुम्ही पीच या फळाचे सेवन करू शकता.
• वजन नियंत्रणात :
पीच फळ सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पीचमध्ये कॅलेरीचे प्रमाण कमी आढळून येते. ज्यामुळे वजन लगेच कमी होते. सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही पीच फळाचे सेवन केले तर तुम्हाला जास्त प्रमाणात भूक लागणार नाही. भूक लागल्यास पीच फळाचे सेवन करणे.
• किडनीचे आरोग्य :
जर तुम्हाला किडनीचे आरोग्य निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही पीच या फळाचे सेवन करणे गरजेचे आहे. पीच फळामध्ये पोटॅशियम हा पोषक घटक आढळून येतो जो किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. पीच फळाचे सेवन केल्याने किडनीचे आजार होत नाही.
• डोळ्यांचे आरोग्य :
डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही पीच फळाचा समावेश करणे. तसेच पीचमध्ये बीटा कॅरोटीन देखील असते जे शरीरातील व्हिटॅमिन ए बनवण्यास मदत करते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए खूप गरजेचा आहे.