प्रतिनिधी – भगवान खुर्पे
श्री पांडुरंग भजनी मंडळ, तळेगाव ढमढेरे या दिंडीचे तळेगाव ढमढेरे येथून पंढरपूर कडे प्रस्थान झाले. ही दिंडी हनुमान मंदिरापासून मुख्य बाजारपेठेतून हरिनामाच्या गजरात पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी नामांकित भजन करी यांच्या भजन कार्यक्रमानंतर मोठ्या उत्साहात दिंडीचे प्रस्थान झाले.यावेळी सेवानिवृत्त तलाठी कैलास नरके,महाराष्ट्र विभागाचे कृषी पदुम विभागाचे उपसचिव किशोर जकाते, दिपक लांडे,ग्रामपंचायत सदस्य ॲड.सुरेश भुजबळ,माजी उपसरपंच विजय ढमढेरे,माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील ढमढेरे,अनिल पांडुरंग भुजबळ,राहुल मुळे,गोरक्षनाथ क-हेकर,विजय घुले,गणेश ढमढेरे,सुधीर ढमढेरे,मंगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.या दिंडी सोहळ्यात दिंडी चालक नाथोबा गायकवाड,अध्यक्ष शामराव मोडक,सचिव विलास गायकवाड, महिलाध्यक्ष विजया मुळे,रघुनाथ मोडक, प्रभाकर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व विठ्ठल आबा ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी सोहळा सुरू आहे.या दिंडीच्या समवेत विणेकरी बाळासाहेब मुळे,चोपदार बाळासाहेब वाघ, तुळशीवाले मंदाकिनी गायकवाड,मंगल मोडक,हौसाबाई काळकुटे,मृदुंगमणी नाथोबा गायकवाड, रघुनाथ मोडक, स्वराज मुळे,गायनाचार्य सोनबा शेलार,रामभाऊ ढमढेरे,सतीश जगताप,दिलीप थोरात,सुरेश ढमढेरे, विठ्ठल ढमढेरे,पताका वाले रमेश ढमढेरे,अशोक विधाटे हार्मोनियम वादक काळुराम तोडकर,जगन्नाथ पंडित व गवळीबाबा भजनी मंडळ मुळे वस्ती,सावता माळी भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ कासारी,समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तळेगाव ढमढेरे हे या श्री पांडुरंग भजनी मंडळ दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत.