प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता.११: पुणे महापालिका महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ता.११ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे जाहीर करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. या आरक्षणानंतर इच्छुकांनी ज्या जागेसाठी इच्छुक आहे त्या जागेसाठी सोशल मीडियावर व कार्यकर्त्यांकडून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये दोन पुरुष व दोन महिला नगरसेवक महापालिकेत निवडुन जाणार आहे.
शेवाळे वाडी, मांजरी बुद्रुक, मुंढवा, केशवनगर, साडेसतरा नळी मधील आरक्षण जाहीर झाले असल्याने राजकीय समीकरणे काही प्रमाणात स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक १५ मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरा नळी मध्ये महिला अनुसूचित जाती (SC) , ओबीसी, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले असल्याने येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. या प्रभागात विकासकामांवर भर देत सध्यस्थितीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक समाजाच्या घटकाला योग्य स्थान निर्माण केले जात आहे. त्यांच्या सणावारात सक्रिय सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात सहकार्य केले जात आहे. महायुतीत सगळे पक्ष एकत्र राहणार की वेगळे लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या जागेसाठी कोणता उमेदवार यासाठी चाचपणी चालू आहे. कोणाला मिळणार उमेदवारी याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
कसे आहे आरक्षण,
प्रभाग क्र. १५ मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरा नळी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
