उत्सवमहाराष्ट्रसामाजिक

निमगाव म्हाळुंगी येथे सामुदायिक गंगापूजन ‌

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

निमगाव म्हाळुंगी चे. मा. सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेतून विमानाने काशी यात्रेला गेलेल्या शिव भक्तांचे सामूहिक गंगापूजन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा!

निमगाव म्हाळुंगी ता.शिरूर जिल्हा पुणे येथील 160 शिवभक्त विमानाने मुंबई ते काशी असा विमानप्रवास करून पुढे अयोध्या, प्रयाग राज, चित्र कुट तिर्थक्षेत्र यात्रा दर्शनासाठी गेले होते. हे सर्व तीर्थक्षेत्र करून आल्या नंतर निमगाव म्हाळुंगी येथे गावात सामूहिक गंगापुजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सकाळी गंगापुजन, नंतर मिरवणूक ढोलताशांच्या गजरात लेझीमपथकाच्या तालावर शिव भक्तांची जंगी मिरवणूक काढून शिव भक्तांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण करण्यात आली होती. यावेळी जय श्री राम च्या घोषणा देऊन सर्व परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीनंतर मान्यवर सत्कार समारंभ तसेच मनोगत पार पडले. यामध्ये बिग बॉसफेम अभिजित बिचुकले यांची प्रमुख उपस्थिती सर्वांची आकर्षित ठरले.सदर कार्यक्रम प्रसंगी निमगाव म्हाळुंगी चे मा. सरपंच तथा विमानाने काशी, अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट तीर्थयात्रेचे आयोजक श्री बापूसाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले तर भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष जयेशदादा शिंदे, आमदार माऊलीआबा कटके यांचे बंधू अनंता कटके,बिगबॉस फेम अभिजित बिचुकले, भाजपा किसान मोर्च्या पुणे जिल्हा सरचिटणीस शरद रासकर, निमगाव म्हाळुंगी चे माजी सरपंच रावसाहेब चव्हाण यांची मनोगत झाली. नंतर ह भ प‌‌‌ वारकरीरत्न श्री चैतन्य महाराज नाशिककर यांची भक्तिमय वातावरणात कीर्तनरूपी सेवा सादर झाली व शेवटी महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी सदर तीर्थयात्रेचे सह आयोजक प्रसिद्ध कीर्तनकार हभप गजानन महाराज इंगोले,संपूर्ण यात्रा सफल होण्यासाठी मेहनत घेणारे शरद रासकर,बाळासाहेब चव्हाण, दिलीप चव्हाण,नामदेव काळे,दिलीप विधाटे, अंकुश नाणेकर, पोपट भागवत, त्रंबकराव चव्हाण,हभप माऊली महाराज पजई,कुंडलिक महाराज मीरासे,शुक्रचार्य महाराज अवचार,सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाडळे, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री बबनराव रणदिवे,रायचंद गव्हाणे,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी प्रभाकर लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम चव्हाण,सौ कोमलताई चव्हाण सि आर फी एफ जवान,शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा गावडे, दादा पवार सर, बापू गावडे,संतोष पाटील, कांतीलाल चव्हाण, दादाभाऊ काळे,अंगणवाडी जेष्ठ सेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या रंजना चव्हाण, पदमा थोरात, पार्वतीबाई भागवत,वैशाली चव्हाण,आशाताई धनवते, शारदा गुंजाळ,आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन बापूसाहेब काळे मा सरपंच निमगाव म्हाळुंगी,तथा अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठाण आणि संयोजक मन की बात पुणे जिल्हा यांनी केले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नामदेव भोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निमगाव म्हाळुंगी गावचे आदर्श सरपंच राजेंद्र विधाटे यांनी केले.

Spread the love

Related posts

गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी शोधून नागरिकांना केले परत..

admin@erp

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मांजरी खुर्दने पटकाविला दुसरा क्रमांक.

admin@erp

मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

admin@erp