प्रतिनिधी: – आशोक आव्हाळे
मांजरी ता.२६: नशा मुक्ती जनजागृती अभियान एक महत्त्वाचे अभियान आहे, ज्याद्वारे समाजाला व्यसनाधीनतेच्या धोक्यातून वाचवता येते. सर्वांनी एकत्र येऊन या कार्यात सहभागी झाल्यास, आपण एक निरोगी आणि सुरक्षित समाज निर्माण करू शकतो असे मत लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी व्यक्त केले.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने नशा मुक्ती जनजागृती अभियान दोन दिवस बुधवार ता.२५ व २६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,अंमलदार यांनी जनता विद्यालय पिंपरी सांडस, जोगेश्वरी विद्यालय वाडेबोलाई व नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती,
1.व्यसन म्हणजे काय . 2.व्यसनाचे प्रकार 3. अमली पदार्थ ओळखणे4. अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम5.अमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम व त्यापासून होणारी कायदेशीर कार्यवाही. 6. व्यसनमुक्तीसाठी शासकीय व स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्र माहिती 7. अमली पदार्थ सेवनापासून उपायोजना 8. मुलांनी आणि पालकांनी घ्यावयाची काळजी 9. अमली पदार्थ व्यसनामुळे वाढणारी गुन्हेगारी
यावेळी विद्यार्थ्यांना एपीआय विजया वंजारी, पीएसआय दिलीप पालवे, पोलीस हवालदार रितेश काळे, पोलीस हवालदार दीपक ठाणगे, तुषार पवार, निखिल गोपाळे,आशिष लोहार नितीन मोरे यांनी मार्गदर्शन केले.