पुणे

दिव्यांग बांधवांना स्वयं रोजगारसाठी गाळे मिळावे अशी मागणी दत्तात्रय ननावरे यांनी केली.

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१९: मांजरी बुद्रुक गावात दिव्यांग बांधवांना स्वयं रोजगारासाठी गाळे उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रवी खंदारे यांना जनाधार दिव्यांग संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मांजरी बुद्रुक गावामध्ये महिला अस्मिता भवन या ठिकाणी तीन गाळे व्यवसायासाठी उपलब्ध आहेत परंतु पुणे मनपा मध्ये समाविष्ट झाल्यापासून हे गाळे न वापरता धुळ खात पडले आहेत.दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी स्वयंरोजगार निर्माण होऊन परावलंबी न राहता स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणे शक्य होईल व दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्य होईल.या प्रसंगी मांजरी गावचे माजी उपसरपंच सुमित घुले, डॉ. शेखर पेटकर ,जनाधार दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, शशिकांत राऊत, केतन कांबळे, विकास सावंत, नाना शेंडगे व दादा बोराडे इ.संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Spread the love

Related posts

वाघेश्वर प्रवेश द्वाराच्या चौकटीसाठी २२लाखाचे दान.

admin@erp

आरक्षणापुर्वीच इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग…

admin@erp

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड.

admin@erp