प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.४: पंचशील बुद्ध विहार दिघी येथे भारतरत्न मित्र मंडळ व रमाई महिला मंडळाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विहारात फुलांची सजावट करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्या हस्ते सकाळी धम्मध्वज फडकविण्यात आला. त्रिशरण पंचशील झाल्यानंतर वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यावेळी चंद्रकांत वाळके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती यावर विचार व्यक्त केले. तर सुभाष भारती,पट्टेबहाद्दूर ताई, लता गायकवाड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान कांबळे यांनी केले. प्रास्ताविक सुखदेव बागुल यांनी केले व आभार सयाजीराव कांबळे यांनी मानले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सीएमई रस्त्यालगत नव्याने निर्माण होणाऱ्या चौकाला “मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर चौक” या नामफलकाचे अनावरण प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी संयुक्त जयंती महोत्सव २०२५ च्या जमाखर्चाच्या अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील बुद्ध विहाराच्या उपासिका व भारतरत्न मित्र मंडळाचे सर्व सभासद यांनी सहकार्य केले. यावेळी खीर वाटप करण्यात आली.