प्रतिनधी:- नूतन पाटोळे.
• पचनसंस्था होते मजबूत : दही पचनसंस्थेसाठी अतिशय उपयुक्त असते. नियमत दही खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. दह्यामध्ये असलेल्या गुड बॅक्टेरियामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
• रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दह्याचा फायदा थेट तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला होतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक आजारांशी लढण्यासाठी तुमचे शरीर सक्षम बनते. नियमित दह्याचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
• वजन कमी करण्यास होते मदत : तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात दह्याचा समावेश करा. दह्यामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करण्यासोबतच दही खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉलची समस्या देखील दूर होऊ शकते.
• हाडे होतात मजबूत : दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि दातही निरोगी आणि मजबूत बनण्यास मदत होते.
- दह्याचे पौष्टिक मूल्य काय आहे? …
- दह्यामध्ये कोणते जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात? …
- दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत …
- दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक …
- हृदयविकाराचा धोका कमी होतो …
- रक्तदाब नियंत्रणात राहतो …
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते …
- वजन नियंत्रणात मदत होते