प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
नागरगाव, ता. शिरूर, जि. पुणे : – राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशस्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बाबुराव दौंडकर स्मारक समिती, रांजणगाव गणपती व भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १० व्या विश्व आयुर्वेद दिनानिमित्त, दिनांक **२३ सप्टेंबर २०२५ रोजी आयुर्वेद शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचे वाटप व वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात ३००० आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामध्ये मुख्यतः आवळा, हिरडा, बेहडा तसेच त्रिफळा इत्यादी औषधी वनस्पतींचा समावेश होता. प्रा. दिगंबर मोकाट यांच्या संकल्पनेतील एक गाव एक औषधी वृक्ष या नुसार नागरगाव हे त्रिफळा वनस्पतीचे गाव म्हणून गावाने घेतलेल्या ग्रामपंचायत ठरावानुसार घोषित करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. दिगंबर जी मोकाट उपस्थित होते. त्यांनी आयुर्वेदिक वनस्पतींचे आरोग्यावर होणारे लाभ तसेच आवळा, हिरडा, बेहडा यांच्या उपयोगाबाबत सविस्तर माहिती दिली. विड्याचे पान, पानफुटी, मंडूकपर्णी, वेखंड, सीता अशोक, इ. अनेक वनस्पती गावकर्यांना वाटप करण्यात आले. हर्बल गाव -स्वयंपूर्ण व आरोग्यदायी होण्याचे दृष्टीने पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राने हा उपक्रम विश्व आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने आयोजित केला होता.
भारतीय किसान संघ प्रांत कोषाध्यक्ष श्री. बबनराव केंजळे, जिल्हा मंत्री **श्री. सतीश जी साकोरे, तसेच **बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे सदस्य **श्री. तानाजी कांतीलाल राऊत व श्री. दत्तात्रय विष्णुदास दरेकर, लाक्षिमीतरु या वनस्पतीविषयी जनजागृती करणारे वृक्षप्रेमी यॊगतज्ज्ञ श्री. प्रभाकर जगताप हे उपस्थिती होते. केंद्राच्या वतीने औषधी वनस्पती विषयी पोस्टर, पुस्तके इ च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. केंद्रातील प्रक्लप व्यवस्थपक डॉ, टी. डी. खरात व गौरी यांनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विठ्ठल बापूराव वाघ यांनी तर आभारप्रदर्शन श्री. सतीश जी साकोरे यांनी केले. रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष आणि वीरांगणा संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय तांबे उपस्थिती होते नागरगाव ग्रामस्थ, सरपंच व अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसाराला चालना देण्याचा उद्देश होता.