संस्थेचे अध्यक्ष संतोष ढमढेरे सभासदांना माहिती देताना
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे : दि.२४(वार्ताहर) तळेगाव ढमढेरे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना यावर्षी १२ टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष ढमढेरे यांनी दिली.तळेगाव ढमढेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे चेअरमन संतोष ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या सभेमध्ये वर्षभरातील संस्थेचा लेखाजोखा सभासदांच्या पुढे मांडण्यात आला. संस्थेचे एकूण सभासद २४०१ आहेत. चालू आर्थिक वर्षात दहा कोटी अठ्ठावीस लाख वीस हजार चौसष्ट रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.तर दहा कोटी बाहत्तर लाख पंधरा हजार सव्वीस रुपये कर्ज वसुली करण्यात आले असून संस्थेचा एकूण नफा बावन्न लाख एकोणसाठ हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये झाल्याचे माहिती संस्थेची सचिव कैलास लोहार यांनी दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे सभासद शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सहकार क्षेत्रात अग्रेसर असणारी व उच्चांकी सभासद असणारी संस्था म्हणून तळेगाव ढमढेरे सोसायटीची ओळख आहे .वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या कामकाजात सभासदांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, यशवंत ढमढेरे,संस्थेचे अध्यक्ष संतोष ढमढेरे ,उपाध्यक्ष कमल भुजबळ,माजी अध्यक्ष पोपटराव भुजबळ,बाळासाहेब भुजबळ,श्रीपती भुजबळ,रामभाऊ ढमढेरे, ज्ञानेश्वर भुजबळ,माजी उपाध्यक्ष राजेंद्र घुमे,अशोक शेलार,संचालक विजूपाटील ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे,पुष्पा भुजबळ,सुनील भुजबळ, तज्ञ संचालक शहाजी ढमढेरे, संतोष भुजबळ उपस्थित होते. सभेचे सचिव म्हणून कैलास लोहार,लेखनिक सचिन बाळसराफ यांनी काम पाहिले.