महाराष्ट्रराजकीय

तळेगाव ढमढेरे सरपंचपदी स्वाती लांडे बिनविरोध

सरपंच लांडे यांचा सन्मान करताना प्रभारी सरपंच कोमल शिंदे व माजी सरपंच अंकिता भुजबळ

प्रतिनधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे दि.24(वार्ताहर) :- तळेगाव ढमढेरेच्या माजी उपसरपंच स्वाती बाळासाहेब लांडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून माजी सरपंच अंकिता भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये स्वाती लांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी गणपत मरबळ यांनी सांगितले.यावेळी प्रभारी सरपंच कोमल शिंदे,माजी सरपंच अंकिता भुजबळ,पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, यशवंत ढमढेरे,अनिल भुजबळ,घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ,शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ,तळेगाव ढमढेरेचे सोसायटीचे चेअरमन संतोष ढमढेरे,माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ,माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ,नवनाथ ढमढेरे,राहुल भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे,दिपाली ढमढेरे,सुरेश भुजबळ,जावेद बागवान,कीर्ती गायकवाड,,गावकाम कामगार ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस उपस्थित होते .लांडे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.गावातील विकासकामांवर जास्तीत जास्त भर देऊन आगामी काळात विविध सार्वजनिक लोकहिताय उपक्रम राबविणार असल्याचे सरपंच लांडे यांनी निवडीनंतर सांगितले.

Spread the love

Related posts

तळेगाव येथे उपद्रवी हुमणी किड प्रतिबंध प्रशिक्षण संपन्न.

admin@erp

राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

admin@erp

मांजरी कोलवडी प्रस्तावित टी. पी योजना रद्द..

admin@erp