तळेगाव ढमढेरे पारंपरिक पोत सोहळ्यात पोत पाजळताना भाविक भक्त.
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे दि.०३(वार्ताहर) :- तळेगाव ढमढेरे येथे दसऱ्यानिमित्त पारंपरिक पोतसोहळा संपन्न झाला.हा सोहळा अनुभवण्यासाठी तळेगाव ढमढेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
दसऱ्यानिमित तळेगाव ढमढेरे येथील श्री. सिद्धेश्वर, शंभोनाथ महाराज,उत्तरेश्वर व श्रीनाथ महाराजांची काठी .गाव मुख्यद्वार पासून पोत सोहळ्यास सुरवात झाली. ढोल ताशाच्या गजरात हौसे,नवसे भाविक भक्त दंग झाले होते.
यामध्ये जय तुळजाभवानी पोत सोहळा,जय भवानी पोत सोहळा,आई तुळजा भवानी पोत सोहळा सहभागी झाले होते .तर दुर्गामाता नवरात्र मंडळ,सावता नवरात्र उत्सव मंडळ,अखिल होळी मैदानं नवरात्र मंडळ.भीमाशंकर नवरात्र उत्सव मंडळ यांनी दसऱ्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने देवीची बाजारपेठेतून मिरवणूक काढली.
मंगळवार दि.०७ रोजी कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ६ वा पारंपरिक पोत पाजळायचा मान तळेगाव ढमढेरेच्या ग्रामस्थांना असून यानिमित्ताने या दिवशी नियोजित राऊळ प्रदक्षिणा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.तळेगाव ढमढेरेत पोत सोहळ्या शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड,पोलिस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण,संदीप इथापे,पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी चोख बंदोबस्त पहिला.
