महाराष्ट्रविज्ञानसामाजिक

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा.

महिलांची प्रतिष्ठा जोपासणे ही समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी – डॉ. संज्योत आपटे

प्रतिनिधी : – भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे, ता.९ – देशातील सर्वच महिला वर्गाची प्रतिष्ठा जोपासली जावी असे डॉ. संज्योत आपटे यांनी प्रतिपादन केले.
तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.माऊली हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. जयश्री कवारके पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. अश्विनी पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते. डॉ. संज्योत आपटे पुढे म्हणल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीची गरज ओळखून आवश्यक उपक्रम राबविण्यात पुणे विद्यापीठ पुढाकार घेत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रात आज महिला वर्ग सक्षमतेने कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांना संधी मिळाल्यास त्या आपले कर्तुत्व निश्चितच सिद्ध करतील यात शंका नाही.कार्यशाळेत महिलांच्या आरोग्य समस्यांविषयी डॉ. जयश्री कवारखे पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व क्षेत्रांमध्ये देशातील समस्त महिलावर्ग कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. घर, संसार, मुलेबाळे यांसह स्वतःचा उद्योग व्यवसाय, नोकरी सांभाळत असताना महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीत उत्तम आरोग्य जपणे हीच महिलांच्या यशस्वीतेची खरी गुरुकिल्ली असल्याचे डॉ. कवारके यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेश ढमढेरे यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला. देशाच्या प्रगतीमध्ये आणि सामाजिक उन्नतीसाठी महिलावर्ग खंबीरपणे पुढे येतो आहे याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांसह संरक्षण व इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रि- पुरुष समानता हीच खरी मानवता असल्याचे महेश ढमढेरे यावेळी म्हणाले. शिक्षण प्रसारक मंडळ संकुलामध्ये प्रारंभी पासून असंख्य विद्यार्थिनींची व्यक्तिमत्व घडली असून या परिवारामध्ये सातत्याने मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याचे महेश ढमढेरे म्हणाले.महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी स्वागत केले. महाविद्यालयाची सर्वांगीण वाटचाल करण्यासाठी आणि काळाची गरज ओळखून नवनवे अभ्यासन सुरू करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ परिवार सज्ज असल्याचे डॉ. मुसमाडे यावेळी म्हणाले. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणावर शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराचा सातत्याने भर असल्याचेही ते म्हणाले. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाविद्यालय प्रगतीच्या योग्य मार्गावर वाटचाल करीत असल्याचेही प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी सांगितले.कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. अश्विनी पवार यांनी प्रस्तावित केले. प्रा. कांचन गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर प्रा. सारिका जेधे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेत एकूण १०७ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

Spread the love

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

admin@erp

शहर सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे ही पी एम आर डी ए ची प्राथमिकता : आयुक्त डॉ. म्हसे

admin@erp

पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार अजित पवारांची मोठी घोषणा..

admin@erp