बाजार मैदान येथे अण्णाभाऊ साठे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करताना.
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे दि.01(वार्ताहर) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे व आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची संयुक्त जयंती सोहळा तळेगाव ढमढेरे येथील संपन्न झाला.
कार्यक्रमाचे निमित्ताने सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांचे वतीने गावातून बाजारपेठे मार्गे प्रभातफेरी काढत महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत बाजार मैदानात रॅलीची सांगता झाली. बाजार मैदान येथे मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तदनंतर प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक प्रा.संपत गारगोटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ,तळेगाव ढमढेरेच्या सरपंच स्वाती लांडे, माजी उपसरपंच मनोज आल्हाट ,भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, तळेगाव ढमढेरे सोसायटीचे चेअरमन संतोष ढमढेरे, माजी चेअरमन श्रीपती भुजबळ, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे, आरंभ उद्योग समूहाचे चेअरमन नवनाथ भुजबळ, पुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक माळी महासंघाचे उपाध्यक्ष अर्जुन तोडकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सामाजिक कार्यकर्ते अविनाश शेलार, सतीश ढमढेरे, अमोल घुमे,अनिल ढमढेरे, श्रावण ढमढेरे, संतोष शेलार, लालासाहेब शेलार, गोविंद भुजबळ, सचिन शेलार, मनोज शेलार, हनुमंत आल्हाट ,प्रवीण आल्हाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शेलार यांनी केले.