पुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

डॉ.चंद्रकांत केदारी यांसकडुन गुजर प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप..

प्रतिनिधी : – भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी यश नर्सिंग होम शिक्रापूरचे संस्थापक डॉ.चंद्रकांत केदारी यांच्या कडून प्रशालेतील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे , अमरज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र केदारी, उद्योजक बाबुराव भोसुरे, शिरूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित शेलार ,युवक कार्यकर्ते सोमनाथ ढमढेरे, सचिन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक चंद्रशेखर सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अविनाश कुंभार यांनी मानले
डॉ.केदारी हे पंचक्रोशीतील शाळेनां अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयांचे दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षे चालू आहे.

Spread the love

Related posts

आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी पल्लवी आव्हाळे…

admin@erp

भुजबळ विद्यालयात वह्यांचे वाटप..

admin@erp

बँक ऑफ बडोदा आरसेटी या संस्थे मार्फत शिक्रापूर येथे ग्रामीण महिलांसाठी मोफत १४ दिवसांचे पेहराव व दागिने बनविण्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले..

admin@erp