प्रतिनिधी :- निलेश जगताप
शिक्रापूर (प्रतिनिधी)
जे जे उपक्रम आमच्या माध्यमातून झाले त्याला प्रसिद्धी देण्याचे काम ख-या अर्थाने तुमच्या माध्यमातून झाले असे प्रतिपादन शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी शिक्रापूर येथे केले.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई गडदे व सरपंच रमेशराव गडदे यांच्या वतीने शिक्रापूर परिसरातील पत्रकारांची दिवाळी गोड होण्यासाठी मिठाई वाटप कार्यक्रमाचे सोमवारी दि.२० आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच रमेशराव गडदे बोलत होते.
दैनिक लोकमतचे पत्रकार प्रा.संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.मनिषाताई गडदे, हार्दिक रमेशराव गडदे, सौ.मेघा तांबे, वैशाली गायकवाड, वंदना रामगुडे, पंढरीनाथ गायकवाड, अंकूश घारे,सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे,मंदार तकटे ,दैनिक सकाळ चे पत्रकार प्रा.नागनाथ शिंगाडे, पत्रकार उदयकांत ब्राम्हणे, पत्रकार एन बी मुल्ला , पत्रकार प्रा. प्रविण जगताप, पत्रकार घनश्याम तोडकर,पत्रकार शेरखान शेख, पत्रकार विजय ढमढेरे, कवी आकाश भोरडे, पत्रकार निलेश जगताप,पत्रकार राजाराम गायकवाड, अंकूश विनायक ढमढेरे,महम्मदभाई तांबोळी ,सोमनाथ भुजबळ कार्यक्रमास उपस्थित होते.
भविष्यकाळात आम्ही पदावर असू किंवा नसू सालाबादप्रमाणे आम्ही तुम्हाला विसरणार नाही असे सांगून सरपंच रमेशराव गडदे कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाले, ज्या -ज्या वेळी आम्ही तुम्हाला हाक देवू त्या -त्या वेळी तुम्ही उभे राहिलात आहात.काही अनुषंगाने आमच्याकडून चुकीचा प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला सांगितले तर वावगे ठरणार नाही.मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे .कुठं ना कुठं माणूस चुकत असतो. माझ्या वाढदिवसानिमित्ताने अनाठायी खर्च टाळून ६५ हजार रूपयांची झाडे शिक्रापूरमध्ये लावलेली आहेत.भविष्यकाळात आपल्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवू असे सुतोवाच सरपंच रमेशराव गडदे यांनी यावेळी केले.
लोकमतचे पत्रकार प्रा.संजय देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले,हा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा उपक्रम सरपंच रमेशराव गडदे यांनी गेल्या ४ वर्षांपासून चालू केला आहे.मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून कर्तव्य फाऊंडेशन शिक्रापूर परिसरात विविध उपक्रम राबवत असतात .त्या उपक्रमांना पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत आहे.अठरा पगड जातीधर्माला ,बारा बलुतेदारांना सोबत घेवून कर्तव्य फाऊंडेशनचे हे काम चालू आहे.वंचित घटकांपर्यंत कर्तव्य फाऊंडेशन पोहचलंय हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलंय.
दैनिक सकाळचे पत्रकार नागनाथ शिंगाडे या वेळी मनोगतात बोलताना म्हणाले, फाउंडेशनच्या नावातच कर्तव्य आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्ये दिलेली आहेत.हक्कानूसार कर्तव्य करायचं हे कर्तव्य फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाला सांभाळायचं काम खरं तर कुठल्या का माध्यमातून होईना सरपंच रमेशराव गडदे यांनी केले आहे.सरपंच रमेशराव गडदे यांनी गेल्या ५ वर्षात केलेले काम वाखाणण्यासारखे आहे असे सांगून पत्रकार प्रा. नागनाथ शिंगाडे यांनी कर्तव्य फाऊंडेशन करत असलेल्या कामाचे कौतुक केले.
पत्रकार घनश्याम तोडकर आपल्या मनोगतात म्हणाले, समाजाला उपक्रमांची गरज आहे.मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार करतीलच.येथून पुढे पत्रकारांचा सहभाग लागला तर आम्हाला अवश्य सांगा सहकार्य करू.आम्हाला काही यथाशक्ती मदत करता येईल ती करू असे आश्वासन पत्रकार घनश्याम तोडकर यांनी यावेळी दिले.
पत्रकार उदयकांत ब्राम्हणे यावेळी प्रास्ताविकात बोलताना म्हणाले, कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून सरपंच रमेशराव गडदे , कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक मनिषाताई गडदे उत्कृष्ट काम करताहेत.आपण सगळे मिळून त्यांना सहकार्य करत असतो याची जाणीव ठेवून त्यांनी आज आपल्या सगळ्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा मनोसंकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. अन्नदान,एस टी स्टॅण्डला सी सी टी व्ही, वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून स्वखर्चातून ६५ हजार रूपयांची झाडे लावली ,मनोरूग्ण सापडले तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना माहेर संस्था इतर संस्थात दाखल करणे अशी कामे कर्तव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगून कर्तव्य फाऊंडेशनची पार्श्वभूमी पत्रकार उदयकांत ब्राम्हणे यांनी यावेळी सांगितली.
कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई गडदे,पत्रकार एन बी.मुल्ला, पत्रकार विजय ढमढेरे, पत्रकार निलेश जगताप,पत्रकार प्रविणकुमार जगताप, पत्रकार शेरखान शेख, कवी आकाश भोरडे समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ, मंदार तकटे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
हार्दिक रमेशराव गडदे यांनी आभार मानले.


