आयुर्वेदिकआरोग्य

चेरीचे आरोग्यदायी फायदे…


1. लठ्ठणा कमी करण्यात मदत
चेरीमध्ये ७५ टक्के पाणी असतं आणि विशिष्ट प्रकारचे विरघळणारे फायबर असतात. चेरीतील फायबर हे शरीरातील फॅट्स शोषून घेतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.

2. हृदयरोग
हृदयरोग्यांसाठी चेरी खूप लाभदायी आहे. चेरीमध्ये झिंक, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, मँगनिज ही तत्वे असतात, जी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे चेरी हे फळ हृदयरोग्यांसाठी आरोग्यदायी आहे.

3. हाडांना मजबुती
चेरीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडांची मजबुती वाढविण्यात मदत करते.

4. निद्रानाश
निद्रानाशाचा त्रास असल्यास दररोज सकळी आणि संध्याकाळी चेरीचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास निद्रानाशापासून मुक्ती मिळते.

5. त्वचेचा पोत सुधारतो
चेरीमध्ये व्हिटामिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडन्टस् असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. चेरी नियमित खाल्ल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेरीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते.

6. डोळ्यांचे तेज वाढविते
चेरीमध्ये व्हिटॅमिन ए असतं. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि डोळ्यांच्या तेजात वाढ होते.

7. स्मरणशक्तीत वाढ
चेरीमध्ये अँथोसायनीन नावाचं रसायन असतं. जे अँटिऑक्सिडन्टप्रमाणे काम करतं. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.

8. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
चेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर अँटिऑक्सिडंटस् सोबतच मेलॅनिन नावाचं देखील एक रसायन असतं. हे सर्व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करतात.

9. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते
चेरीमध्ये पोटॅशियम खूप प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील सोडिअमची मात्रा कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

10. डायबेटिस रुग्णांसाठी फायदेशीर
चेरीमध्ये अँथोसायनिन नामक रसायन असतं. जे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढविण्यात मदत करतं. त्यामुळे डायबेटिस पेशंटनी चेरी आवर्जून खावी.याचबरोबर चेरी हे फळ डायरिया, अस्थमा या रोगांसाठी सुद्धा लाभदायक आहे. चेरी हे फळ डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करते.

Spread the love

Related posts

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व.

admin@erp

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व.

admin@erp

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे…

admin@erp