Uncategorizedपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

ग्रामपंचायत शिक्रापूर वाचनालयात उत्साहात पंडित नेहरू जयंती व बालदिन साजरा!

प्रतिनिधी : – निलेश जगताप

शिक्रापूर प्रतिनिधी: येथील ग्रामपंचायतच्या शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालयाच्या वतीने आज (१४ नोव्हेंबर) पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श सरपंच रमेशराव गडदे, प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी श्री नंदकुमार वैद्य,जि. प. प्राथमिक शाळा शिक्षक श्री.चेतन कुर्रेवार गुरुजी यांच्या हस्ते झाले.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी ‘चाचा नेहरू’ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी मांडले यानंतर बालदिनाचे महत्त्व सांगणारे मनोगत सादर करण्यात आले. नेहरूंचे लहान मुलांवरील प्रेम आणि शिक्षणाविषयीचे विचार विद्यार्थ्यांनी भाषण, कविता व नाटिकेतून सादर केले.

या प्रसंगी आयोजित गायन, वाचन स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
“मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणे हीच बालदिन साजरा करण्याची खरी भावना आहे,” असे आदर्श सरपंच रमेशराव गडदे व प्रमुख अतिथी शिक्षक चेतन कुर्रेवार गुरुजी यांनी सांगितले.
यावेळी आदर्श सरपंच रमेशराव गडदे, प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी नंदकुमार वैद्य, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पाटील, प्रमुख पाहुणे चेतन कुर्रेवार गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते श्री बबनराव मांढरे पाटील, प्रशांत वाबळे, वाचनालय सभासद अरविंद गरुड ,बापू भुजबळ ,पूनम जगदाळे, गणेश जगदाळे ,ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच मुलांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प ,पेन्सिल , खोडरबर ,शॉपनर आणि खाऊ व अल्पोपहार वाटप करण्यात आला. यावेळी जवळजवळ ८० विद्यार्थी बालवाचक उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण रंगून गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता झाली.

Spread the love

Related posts

पुणे जिल्हा कार्येकरी अध्येक्ष पदी प्रकाश कर्पे यांची फेरनिवड…

admin@erp

गणेश विसर्जन मिरवणुकीत व्यसनमुक्ती जनजागृती अभियान फेरी…

admin@erp

पांडुरंग दिंडि सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान.

admin@erp