गुरु आणि गुरू -शिष्यांमधील अलौकिक नात्याचे दर्शन
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता. १० : मांजरी खुर्द (ता.हवेली) येथे गुरुपौर्णिमा एक दिवशीय वैष्णव मेळावा,गुरूपुजन, चक्री प्रवचनाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.गुरुने दिलेला वसा समर्थपणे पुढे चालविण्याचे आश्वासन देणाऱ्या गुणी शिष्य, आपल्या शिष्यांकडे कौतुकाने पाहणारे गुरु आणि गुरू- शिष्यांमधील अलौकिक नात्याचे दर्शन अनुभवणारे प्रेक्षक अशा वातावरणात ‘अनुग्रहाचा’ कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यात्मिक विकास परिषद व ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने ह भ प जगदीश महाराज उंद्रे व ह भ प बबन आप्पा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देवांनाही या पृथ्वी तलावावर अवतार घेतल्यानंतर स्व स्वरूपाची ओळख ही सद्गुरूंकडूनच करून घ्यावी लागली. मग आपल्या सर्वसामान्य जीवांना जर शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही असे ह भ प बबन भुजबळ महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केलेल्या प्रवचन सेवेत सांगितले.
सकाळी ज्ञानेश्वरी पुजन करण्यात आले. दुपारी हभप भगवान खुरपे, ह भ प राहुल महाराज निंबाळकर, ह भ प दत्तात्रेय महाराज पारखे, ह भ प संगिता उंद्रे व ह भ प जगदीश महाराज उंद्रे यांची प्रवचन रूपी सेवा पार पडली.
यादरम्यान शेवाळेवाडीचे माजी उपसरपंच अमोल जगताप, सोमनाथ दरेकर, गणेश शेवाळे,नितीन उंद्रे,हरिष मोरे, सचिन गाढवे,हरिष जाधव आदी साधकवृंद उपस्थित होते.