पुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन पाठीवर कौतुकाची थाप

प्रतिनिधी :- फुरसुंगी

श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयामध्ये आज विष्णुजी शेकोजी सातव विद्या प्रतिष्ठान, वाघोली यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालय भेकराईनगर, धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय तुळापूर, श्री संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहगाव, विष्णूजी शेकुजी सातव हायस्कूल वाघोली, या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. वैशाली तिवारी, ॲड. वैष्णवी तिवारी, तुळापूरचे मुख्याध्यापक आबा जाधव, प्राचार्य डॉ. सुनील कामठे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सुनील दीक्षित, पर्यवेक्षक यास्मिन इनामदार, मारुती खेडकर, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात एकूण १८ विद्यार्थ्यांना एक लाख एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेचे, शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले.
प्राचार्य डॉ. सुनील कामठे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना, शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून ती विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारी प्रेरणा आहे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीच्या पदाधिकाऱ्यांनी सातव प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले. प्रवीण भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर अपर्णा बिरदवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेचे अभिनंदन केले.

Spread the love

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्था: निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; कधी होणार निवडणूक?

admin@erp

लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय लवकर सुरू करावे : बापूसाहेब पठारे

admin@erp

राजे श्री शिवशाही समूहाचे 11 वे वर्धापन दिन थाटात संपन्न…

admin@erp