प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला.
हा दिवस भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, प्रशालेचे क्रीडाशिक्षक राजेंद्र भगत,गोरक्षनाथ वाळके प्रशालेचे सर्व क्रीडा शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी प्रशालेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कबड्डी, खो-खो ,व्हॉलीबॉल व रस्सीखेच सारख्या स्पर्धा अत्यंत उत्साहातसंपन्न झाल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
या क्रीडा दिना साठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानध सचिव अरविंद ढमढेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते संचालक विजय ढमढेरे,महेश ढमढेरे यांनी कौतुक केले व स्पर्धाना शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.