प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक व स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक, तळेगाव ढमढेरे येथे विद्या सहकारी बँकेचे व शिक्षण प्रसारक मंडळ, तळेगाव ढमढेरेचे संचालक महेश ढमढेरे तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्रीकांत सातपुते यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
