उत्सवपुणेमनोरंजनमहाराष्ट्रशैक्षणिक

गुजर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत सन 2025 26 चे वार्षिक स्नेहसंमेलन व आनंद मेळावा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात आणि जल्लोषात पार पडले.यावेळी दिनांक 22 डिसेंबर रोजी आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी 150 खाद्यपदार्थांचे स्टॉल चे आयोजन करून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामध्ये उपलब्ध केले होते या सर्व खाद्यपदार्थांचा प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आनंद यावेळी लुटला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनीही या आनंद मेळाव्याला भेट दिली व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी प्रशालेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, रोटरियन अनिल कासोदेकर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, फर्स्ट लेडी अनिता कासोदेकर, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, डॉ. सुजित शेलार संस्थेचे मानद सचिव अरविंद ढमढेरे ,संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, राहुल गुजर, परेश सातपुते, गुलाबराव गवळे, वि.ल.पाटील, सचिन पंडित ,पालक शिक्षक संघाचे अनुराग मेटे ,डॉ. चंद्रकांत केदारी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महेश ढमढेरे यांनी भूषवले त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रेरणा दिली. व हे शालेय स्नेहसंमेलन कला ,संस्कृती आणि आत्मविश्वास यांचा सुंदर समतोल साधणारा कार्यक्रम आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले. यामध्ये पारंपारिक नृत्य, आधुनिक नृत्य, शेतकरी नृत्य, विविध लोकनृत्यांचा समावेश होता.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या रंगतदार शिस्तबद्ध आणि उत्साह पूर्ण अशा स्नेहसंमेलनाने उपस्थित यांची मने जिंकली.

Spread the love

Related posts

भक्तीमार्गावरचा हा प्रवास प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, शांती आणि समाधान घेऊन येवो : आमदार बापूसाहेब पठारे

admin@erp

मांजरी खुर्द आणि परिसरात धुंवाधार पाऊस

admin@erp

मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

admin@erp