प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.६ : ज्ञान,भाग्य,बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती याच प्रतीक असणाऱ्या गणपती बाप्पाचा सण व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाने साजरा करण्याची वेळ आली आहे असे अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी सांगितले.
अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था व विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते मांजरी बुद्रुक मुळामुठा नदीवरील विसर्जन घाटापर्यंत व्यसनमुक्ती जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली होती यावेळी बेल्हेकर बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे गणेश मंडळातील तरुण तडफदार कार्यकर्ते गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर नाचण्यासाठी दारू आणि इतर आरोग्यास घातक व्यसने करतात विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचण्यासाठी सुरू केलेल्या व्यसनाच्या आहारी जाऊन हळूहळू या तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होते म्हणून आम्ही या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना आव्हान केलेले आहे की दारू पिणारा आणि घातक व्यसन करणारा कार्यकर्ता गणेश मंडळांमध्ये नसावा आणि असा व्यसनी कार्यकर्ता असल्यास त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी मंडळांनी प्रयत्न करावा हाच या जनजागृती फेरीच्या पाठीमागचा आमचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी सांगितले. या जनजागृती फेरीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संयोजन ॲड.प्रसाद कोद्रे,संदीप मेमाणे,दर्शन ईशी, मोनिका तळेकर,गौरी तावरे, अनुजा कांबळे,पूजा पांगरे,कुशल मोरे यांनी केले.