उत्सवमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान-ॲड. आशिष शेलार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य

राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मुंबई, दि. २२ ऑगस्ट : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक २३ ऑगस्ट, २०२५ ते ०६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

Spread the love

Related posts

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने एक राखी व्यसनमुक्ती जनजागृतीची हा उपक्रम राबविण्यात आला.

admin@erp

शिक्रापूर परिसरातील बाल चमूंचे वाजत गाजत शाळेमध्ये स्वागत..

admin@erp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

admin@erp