– खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवा. ज्यामुळे तुमचा खोकला थोडावेळ थांबेल. खडीसाखर चावून खाऊ नका. खडीसाखर फक्त तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचं घशाचं इनफेक्शन कमी होईल.
– जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.
– जेवणानंतर बडीसोप आणि खडीसाखर खाण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते.
– जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खडीसाखरेचे पाणी प्यायले तर तुम्हाला दृष्टीदोष कमी होतात. शिवाय मोतीबिंदूपासून तुमचा बचाव होतो.
– खडी साखर तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दररोज खडीसाखर आणि अक्रोडाची पावडर दूधातून घ्या. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटेल.