आरोग्यपुणेमहाराष्ट्र

कोलवडी- साष्टे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२५: कोलवडी – साष्टे येथे वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते मंगळवार (ता.२३) रोजी करण्यात आले. या उपकेंद्रामुळे कोलवडी व परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा, प्रसुती सेवा, बालकांचे लसीकरण, तपासण्या आणि औषधोपचार व आरोग्यावरील मार्गदर्शन गावच्या पातळीवरच होणार आहे. वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या या उपकेंद्रासाठी ५५ लाखांचा निधी शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला होता. कोविड काळामध्ये कोलवडी येथे आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना लसीकरणासाठी इतर गावात जावे लागत होते. आता गाव पातळीवर आरोग्य उपकेंद्र सुरू झाल्याने आरोग्य सुविधा घेण्यास नागरिकांना मदत मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, आरोग्य ही महत्वाची सेवा आहे. ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरोग्य सेवेसाठी येथे निवासी डॉक्टर असणार आहेत. तसेच नवी इमारत सर्व सोयींनी युक्त आहे. या केंद्रात चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना आमदार कटके यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. या आरोग्य केंद्रात प्रसूती सेवा, लसीकरण सत्र, विविध आजारांवर उपचार अशा विविध आरोग्य सेवा मिळणार आहेत.
कोलवडी- साष्टे व परिसरातील नागरिकांना गावच्या पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने याचा फायदा सर्वांना होणार आहे. ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची आज खऱ्या अर्थाने पूर्तता झाल्याचे समाधान झाल्याचे सरपंच विनायक गायकवाड यांनी म्हटले आहे.
या दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन किशोर उंद्रे,संचालक रामदास गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच सचिन तुपे, उपसरपंच संदीप गायकवाड, मिलापचंद गायकवाड ,पंकज गायकवाड, विकास कांचन, युवराज काकडे, पोलीस पाटील मीना गायकवाड, अशोक गायकवाड, सचिन गायकवाड, अजित गायकवाड, ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामसेवक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Related posts

पेर (नाशपाती) खाण्याचे फायदे….

admin@erp

विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया..

admin@erp

केशरचं पाणी पिण्याचे फायदे.

admin@erp