प्रतिनिधी :- आशोक आव्हाळे
मांजरी ता.१६: कोलवडी (ता.हवेली) येथे देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण, मानवंदना, राष्ट्रगीत,संचलन, स्वागतगीत, स्वागत समारंभ, देशभक्तीपर गीते ,क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सामुदायिक संगीत कवायत, भाषणं, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप इ.भरगच्च कार्यक्रमांनी देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन म कोलवडी परिसरात मोठ्या जल्लोषात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी येथील ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच विनायक गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे डॉ.ऋषिकेश गायकवाड, विद्यालयाचे रामदास कोंडीबा गायकवाड, साई गणेश ना. सह.पतसंस्थेचे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन किशोर उंद्रे, ग्रामपंचायत सदस्य योगेश मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांत गायकवाड, यशवंतचे माजी संचालक तुकाराम पवार, साई गणेश ना सह पतसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब मुरकुटे, उपसरपंच संदीप गायकवाड,अजित गायकवाड, रमेश मदने, विकास गायकवाड, सचिन गायकवाड, अशोक गायकवाड तसेच आजी माजी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.