प्रतिनिधी : – निलेश जगताप.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी या गावांमध्ये शिव मल्हार सेवा ट्रस्ट कोंढापुरी यांच्या माध्यमातून श्री मार्तंड भैरव चंपाषष्ठी महोत्सव मल्हार गड कोंढापुरी या ठिकाणी अतिशय उत्सांमध्ये व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये चंपाषष्ठी चा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम तब्बल सहा दिवस चालत असताना यामध्ये दररोज संध्याकाळी विविध कार्यक्रम होत होते यामध्ये सामाजिक धार्मिक अध्यात्मिक असे विविध कार्यक्रम हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाची सांगता देवाच्या लग्नाने व साखरपुड्याने झाली विशेष करून जगप्रसिद्ध आमटी भाकरीचा आस्वाद हजारो ग्रामस्थांनी भाविक भक्तांनी घेतला विशेष करून आशिष शेठ गायकवाड रमेश शेठ गायकवाड स्वप्निल शेठ शिवाजी गायकवाड विजय गायकवाड बळवंत गायकवाड शहाजी गायकवाड समरजीत गायकवाड धनंजय गायकवाड अर्जुन गायकवाड हरिचंद्र गायकवाड दिनेश गायकवाड निळाप्पा गायकवाड व तसेच गावातील तरुणांनी व महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवा.शयावेळेस बापूसाहेब गायकवाड माजी सैनिक यांनी सालाबाद प्रमाणे आमटी आणि भाकरी चे सौजन्य दिले.
