प्रतिनधी :- नूतन पाटोळे
धुळ आणि प्रदूषणापासून केसांचे रक्षण
सूर्यफुलाच्या तेलात अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असल्याममुळे ते केसांसाठी आरोग्यदायी असते. यातील व्हिटॅमिन ईमुळे केसांवर संरक्षक कवच निर्माण होते आणि केसांचे बाहेरील धुळ आणि प्रदूषणापासून होणारे नुकसान टाळले जाते. मात्र यासाठी केसांना नियमित सूर्यफुलाचे तेल लावणं गरजेचं आहे. शॅम्पू करण्यापूर्वी आठवड्यातून दोनदा केसांना सूर्यफुलाच्या तेलाने मालिश करा आणि मगच केस धुवा. ज्यामुळे काही दिवसामध्येच तुम्हाला केसांमध्ये झालेला आश्चर्यकारकफरक दिसायला लागेल.
कोरड्या केसांसाठी उत्तम
सूर्यफुलाचे तेल यामध्ये असे घटक असतात ज्यामुळे केसांचे योग्य पद्धतीने पोषण होते. केसांच्या मुळांना योग्य प्रमाणात पोषण मिळाल्यामुळे केस चमकदार होतात. केसांचा कोरडेपणा यामुळे हळूहळू कमी होण्यास मदत होते.
केसांची वाढ चांगली होते
केसांची मुळे आणि क्युटिकल्स सूर्यफुलाचे तेल लावण्यामुळे मऊ आणि मुलायम होतात. ज्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील या तेलापासून तयार केलेला हेअर मास्क तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल. यासाठी मेथीच्या बिया, नारळाचे तेल आणि सूर्यफुलाचे तेल एकत्र गरम करून केसांना लावा. ज्यामुळे केसांच्या समस्या कमी होतील आणि केस मजबूत आणि लांब होतील.
स्काल्पवर येणारे पिंपल्स कमी होतात
अनेकांना केसांच्या मुळांमध्ये ताण अथवा त्वचेच्या समस्यांमुळे पिंपल्स येण्याचा त्रास जाणवतो. ज्यांचे केस अती प्रमाणात तेलकट असतात त्यांना ही समस्या नेहमी सतावते. या स्काप्लवर येणाऱ्या पिंपल्सपासून बचाव करायचा असेल तर केसांना सूर्यफुलाचे तेल लावा. या तेलात नियासिन, सेलेनिअम, कॅल्शिअम आणि लोह असते ज्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचेवरील पिंपल्स कमी होतात.
कोंडा कमी होतो
सूर्यफुलाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंड्याद्वारे होणारे इनफेक्शन कमी होते. इनफेक्शमनमुळे येणारी खाज, सूज, जळजळ, लालसरपणा, कोंडा कमी होतो. शिवाय या तेलाच्या मालिशमुळे केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो.