प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
कॉफीपेक्षाही गुणकारी :
कॉफीमध्ये कॅफीनचा वापर केला जातो. जो आपल्या शरीरासाठी घातक आहे. अशा वेळी केशरचं पाणी प्यायल्याने तुम्ही निरोगीही राहाल आणि कॉफीइतकाच हे पाणी पिऊन तुमचा दिवसही उत्साही राहील.
2. निरोगी त्वचेसाठी उपयुक्त :
तुम्ही जर रोज केशरचं पाणी प्यायलात तर तुमची स्किनही तजेलदार तसेच निरोगी राहील. कारण या पाण्यात कोणतंच केमिकलयुक्त पदार्थांचा समावेश नाही.
3. निरोगी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त :
नियमित केशरचं पाणी प्यायल्यास काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांत बदल जाणवेल. तुमचे केस अधिक घनदाट होतील.
4. नियमित मासिक पाळी :
जर तुमच्या मासिक पाळीचा कालावधी कमी असेल आणि या दरम्यान पोटात वेदना होत असतील तर केशरचे पाणी प्यायल्याने वेदना कमी होण्यास आणि प्रवाह संतुलित करण्यास मदत होऊ शकते.
5. बुद्धीचा विकास होण्यासाठी :
बुद्धीचा विकास होण्यासाठी केशर खूप महत्त्वाचे ठरते. बुद्धीचा विकास होण्यासाठी केशरमध्ये आवश्यक तेथे सर्व गुणधर्म आढळतात त्यामुळे लहान मुलांना केशर खायला दिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास होईल.